Disclaimer







     
            Welcome to Marathistories .
लवकरच तुमच्या समोर सादर होणार आहे एक नवीन कथा.... ~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~

Wednesday 17 January 2018

~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~ प्रस्तावना

~ रावतेंचा पछाडलेला वाडा ~
मूळ लेखक - नारायण धारप आणि डॉ. अरुण मांडे 
~ प्रस्तावना ~ 
 
(नारायण धारपांबद्दल थोडंसं: - नारायण धारप हे नाव आताच्या वाचन करणाऱ्या पिढीला नवीन असले, तरीही आपल्या रहस्यमय लेखनाने त्यांनी एक काळ गाजवला होता. गेल्या शतकातील साठच्या दशकात त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि त्यानंतर अखेरपर्यंत ते सातत्याने लिहीत राहिले. दूरदर्शन आणि इतर प्रसारमाध्यमांची फारशी चलती नव्हती, त्या काळात सामान्य वाचक अतिशय आतुरतेने त्यांच्या लेखनाची वाट पाहत असत. नारायण धारपांच्या कथा "भय' या विकाराची अनेक रूपे घेऊन येतात. कथानकात पुढे काय घडणार याची उत्सुकता कायम ठेवत वाचकाला आपल्या लेखनात गुंतवून ठेवणे, रहस्यमय व गूढ पद्धतीने भयाच्या तावडीत माणसे कशी सापडतात, शारीरिक व मानसिक वेदना कशी भोगतात, भूत-पिशाच्च, क्रूर पीडा देणाऱ्या जीवसृष्टीच्या काल्पनिक जगाचे अस्तित्व कसे जाणवते आणि दैवी शक्तीने, चमत्काराच्या कृपेने त्यातून ती कशी सुटतात याचे वर्णन अतिशय चित्तवेधक आहे.)

मोठमोठ्या वाड्यांबद्दल सर्वांना एक प्रकारचं आकर्षण वाटत असतं. त्याच्या गूढवलयाचं निराकरण हवं असतं. अन हा वाडा तर पेशवेकालीन...! काय काय घटना घडल्या असतील त्यावेळी वाड्यात...? तेथे वावरणारी कित्येक माणसं - त्यांचे हेवेदावे - सलोखा की सूडवैर - अन त्यांचे आत्मे - अजून असतील का वावरत - तेथेच - त्यांना मुक्ती मिळेल...?

क्रमशः

भाग ०१

0 comments:

Post a Comment